Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

पुण्यात ट्रिपलसीट दुचाकीस्वार रडारवर

पुण्यात ट्रिपलसीट दुचाकीस्वार रडारवर

तीन दिवसांत १ हजार २६५ जणांवर कारवाई

marathinews24.com

पुणे – बेशिस्त वाहन चालकांना धडा शिकवण्यासाठी वाहतूक विभागाने कारवाईची मोहीम वेगाने राबवली आहे. नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मागील तीन दिवसांत ट्रिपल सीट, मॉडिफाईड सायलेंसर आणि ड्रिंक अँड ड्राईव्हविरोधात कडक कारवाई करण्यात आली. तब्बल १ हजार २६५ ट्रिपलसीट वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.

खंडणी प्रकरणात तोतया महिला वकील अटकेत – सविस्तर बातमी 

ध्वनी प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या मॉडिफाईड सायलेंसर असलेल्या २३४ वाहन चालक जाळ्यात सापडले आहेत. संबंधित दुचाकीस्वाराविरुद्ध कारवाई करून सायलेंसर जप्त करण्यात आले. कारवाईतून ५ लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय विविध प्रकारचे वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांकडून ५१ लाख ५४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नाकाबंदी कारवाईत २३४ सायलेंसरसह ८५२ वाहने जप्त करण्यात आली.

शहरातील ३० ठिकाणी नाकाबंदी करून ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’विरोधात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये १८६ वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. वाहतूक शाखेकडून नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मॉडिफाईड सायलेंसरमुळे ध्वनीप्रदूषण वाढत असल्याने त्याचा वापर टाळावा, मद्यपान करून वाहन चालवू नये आणि ट्रिपल सीट प्रवास टाळून सुरक्षित वाहतूक राखावी, असे आवाहन करण्यात पोलिस उपायुक्‍त हिंमत जाधव यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×