भरधाव कंटेनरची धडक; अज्ञात पादचाऱ्याचा मृत्यू

पुण्यात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – भरधाव कंटेनरच्या धडकेत एका अज्ञात पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना खराडी बायपास चौकात नगर–पुणे रोडवर घडली आहे. ही घटना बुधवारी रात्री उशिरा घडली असून, याप्रकरणी लक्ष्मण अंकुश सोलनकर (वय ३५, रा. लातूर) या कंटेनर चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

लघुशंकेसाठी थांबला अन् रिक्षा चालकानेच बॅग चोरली – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. संबंधित व्यक्ती हा नगर–पुणे रोडकडून पुण्याच्या दिशेने रस्ता ओलांडत असताना कंटेनरने त्याला जोरदार धडक दिली. अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, शहरात वाढत्या वेगवान आणि निष्काळजी वाहन चालकांमुळे अपघातांच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×