उपायुक्त कृषीकेश रावलेंचा कर्मचार्याला दणका
marathinews24.com
पुणे – मटका, जुगारासारखे अवैध धंदे चालविणार्या सराईत गुन्हेगाराच्या संपर्कात राहणे समर्थ पोलिस ठाण्यात नेमणूकीस असलेल्या पोलिस शिपायाला महागात पडले आहे. संबंधित कर्मचार्याचे वर्तन गंभीर स्वरुपाचे असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी त्याला एक वर्ष वेतनवाढ रोखण्याची शिक्षा सुनावली आहे. संबंधित कर्मचारी हे प्रविण राजेंद्र चव्हाण (वय.३५,रा. सोमवार पेठ) या आरोपीच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले आहे.
टोळक्याकडून मारहाण, औंध परिसरातील घटना – सविस्तर बातमी
आरोपी चव्हाण याच्यावर जुगार, शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलिस अधिनियम, दंगल असे गुन्हे समर्थ पोलीस ठाण्यात दाखल आहेत. कर्मचारी हे वैद्यकीय रजेवर असताना ८ वेळा चव्हाणच्या संपर्कात होते. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ हा प्रकार घडला होता. चौकशीत संबंधित कर्मचार्याचे आरोपीसोबत संपर्क असल्याचे उघडकीस आले. सुरुवातीला दोन वर्ष वेतनवाढ रोखण्याची शिक्षा ठोठावली होती. मात्र पोलिस कर्मचार्याचे म्हणणे एकूण घेतल्यानंतर त्यामध्ये अंशतः बदल करण्यात आला. त्यानंतर एक वर्ष वेतनवाढ रोखण्याचे आदेश उपायुक्त रावले यांनी दिले.
यापुर्वी गुन्हे शाखेच्या दोघांचे निलंबन
संबंधित प्रकरणात गुन्हे शाखेच्या दोघा पोलिस कर्मचार्यांचे यापुर्वी निलंबन करण्यात आले होते. हे कर्मचारीही आरोपी चव्हाणच्या संपर्कात असल्याचा त्यांच्यावर आरोप होता. नोव्हेंबर २०२५ मध्ये जुगार घेणार्या औंदुबर अर्जुन सोनावणे याला समर्थ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याने प्रविण चव्हाण याच्यासाठी मटका जुगार घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर चव्हाणला ताब्यात घेण्यात आले .त्यावेळी त्याचा मोबाईल तपासला तेव्हा गुन्हे शाखेचे हे दोघे त्याच्या संपर्कात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली होती.





















