Breking News
‘जनगणना २०२७’ कल्याणकारी योजनांची सुनिश्चिती- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारबुद्ध पौर्णिमेनिमित्त ‘धम्म पहाट’ला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसादभोर तालुक्यात बालिकेवर अत्याचार करून खूनलाच मागितल्यापकरणी पोलीस उपनिरीक्षकाला अटकदारू पिण्याच्या वादातून मजुराच्या डोक्यात दगड घालून खून“संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा गौरव: संघर्षाने उभारलेला हे राज्य, आजची वास्तविकता!” – विशेष लेखजिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कार

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने १ कोटींची फसवणूक

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची १२ कोटींची फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एकाची १ कोटी ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ४५ वर्षीय तक्रारदाराने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मानसिक त्रास देत अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केले – सविस्तर बातमी 

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वारजे माळवाडी भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात तक्रारदारांशी संपर्क साधला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. चोरट्यांनी त्यांना समाजमाध्यमातील एका समुहात सहभागी करुन घेतले. तक्रारदाराने पैसे गुंतविल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा मिळाल्याचे भासविले. प्रत्यक्षात परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करत आहेत.

ज्येष्ठ नागरिकाची ६ लाखाांची फसवणूक

गॅस देयक अद्ययावत करण्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वारजे माळवाडी भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. तक्रारदाराच्या सोसायटी पाईपद्वारे गॅस पुरवठा होता. गॅस देयक अद्ययावत (अपडेट) करण्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या बंँक खात्याची माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी खात्यातून सहा लाख रुपये काढून दुसऱ्या खात्यात हस्तांतरित केले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×