Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

मानसिक त्रास देत अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केले

खासगी विद्यापीठात चोरी प्रकरणी गुन्हा दाखल

तरुणावर बाणेर पोलिसांनी दाखल केला गुन्हा

marathinews24.com

पुणे – अल्पवयीन मुलीला मानसिक त्रास देऊन तिला इमारतीवरून उडी मारून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना ४ एप्रिलला सकाळी साडे अकरा वाजता बालेवाडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी गोरख सुग्रीव गोरे (वय २१, रा. बालेवाडी, मूळ मंठा, जालना) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

हातउसने पैशांच्या वादातून पिस्तूल रोखून मारहाण – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी गोरे हा बालेवाडीत राहायला असून, त्याने ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीसोबत वारंवार संपर्क साधला. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत तिला मानसिक त्रास दिला. संबंधित आरोपी गोरे याने तिच्या घरी जाऊन शिवीगाळ केली. तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. सततच्या त्रासाला कंटाळून मुलीने टेरेसवरून उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०७, १०८, ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अलका सरग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×