Breking News
पुणे, पिंपरी चिंचवड शहराची वाढती विजेची गरज ध्यान्यात घेऊन बहृत आराखडा तयार करापुणे ग्रोथ हब आराखडा अंतिम करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करा- व्ही. राधामहाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या संचालक कार्यालयाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटनपुणे जिल्ह्यात सर्व स्वयं सहाय्यता समूहाची ‘लोकोश ॲप’वर नोंदणी- प्रकल्प संचालक शालिनी कडूबारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी पूर्णएआय सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ; दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध -राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर‘स्वप्नसुंदरी मी भारताची २०२६’ : पुण्यात सौंदर्य स्पर्धेचे आयोजननगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावीविधिमंडळात विद्यार्थ्यांची अभ्यासक भेट; डॉ. नीलम गोऱ्हे यांचा संवाद ठरला आकर्षणरोजगाराच्या नावाखालील फसवणुकीपासून सावध रहा 

हातउसने पैशांच्या वादातून पिस्तूल रोखून मारहाण

हातउसने पैशांच्या वादातून पिस्तूल रोखून मारहाण

स्वारगेट परिसरातील घटना; दोघे अटकेत

marathinews24.com

पुणे – हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून पिस्तूल रोखून तिघांना मारहाण करण्यात आल्याची घटना शंकरशेठ रस्त्यावरील धोबी घाट भागात घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांना अटक केली. याबाबत कानिफनाथ विष्णू नायडू (वय ५१, रा. सेवक मित्र मंडळाजवळ, कासेवाडी, भबानी पेठ) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी केलेल्या मारहाणीत नायडू आणि त्यांचे दोन भाचे जखमी झाले आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.

बालविवाह प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मार्च रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नायडू आणि त्यांचे भाचे शंकरशेठ रस्ता परिसरातील धोबी घाट भागात असलेल्या स्मशानकाली मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्या वेळी नायडू यांनी आरोपींना दिलेले हातउसने पैसे परत मागितल्याने वाद झाला. त्यानंतर आरोपींनी नायडू यांच्या डोक्यावर शस्त्राने वार केला. नायडू यांच्याबरोबर असलेल्या भाच्यांनी मध्यस्थी केली. तेव्हा आरोपींनी नायडू आणि भाच्यांवर पिस्तूल रोखून जिवे मारण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×