Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

बालविवाह प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा

बालविवाह प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा

महिला आणि बालविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

marathinews24.com

पुणे – शहरातील बिबवेवाडी भागातील एका १६ वर्षीय युवतीचा विवाह केल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जिल्हा महिला आणि बालविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. महिला आणि बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे, बालविकास प्रकल्प अधिकारी सुधीर ढाकणे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मंगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी विशेष हेल्पलाइन (१०९८) सुरू करण्यात आली आहे.

मकोका’ कारवाईनंतर फरार; झालेला गुंड बीडमधून अटकेत – सविस्तर बातमी    

बिबवेवाडी भागातील अल्पवयीन युवतीचा विवाह करुन देण्यात आल्याची माहिती हेल्पलाइनवर मिळाली. त्यानंतर पर्यवेक्षिका मोनिका जाधव आणि पथकाने भेट दिली. चौकशीत अल्पवयीन मुलीचा विवाह करुन देण्यात आल्याची माहिती मिळाली. मुलीचे वय निश्चित करण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला तपासण्यात आला. तेव्हा ती अल्पवयीन असल्याचे उघडकीस आले. अल्पवयीन युवतीचा जाणीवपूर्वक विवाह करुन देण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर याप्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील कलम ९, १० आणि ११ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी युवतीच्या नातेवाईकांची बाजू तपासली. त्यानंतर या प्रकरणात संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस उपनिरीक्षक अमोल माने तपास करत आहेत. ‘बालविवाहाचे प्रकार आढळून आल्यास त्वरीत विशेष हेल्पलाइन (१०९८) संपर्क साधावा’, असे आवाहन जिल्हा समन्वयक अली अख्तर अन्सार यांनी केले आहे. ‘माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे’, असे त्यांनी नमूद केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×