Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

मकोका’ कारवाईनंतर फरार; झालेला गुंड बीडमधून अटकेत

महिलेचे दागिने हिसकावणारा चोरटा गजाआड

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बीड जिल्ह्यातून केली अटक

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केल्यानंतर फरार झालेल्या गुंडाला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बीड जिल्ह्यातून अटक केली. कारवाईनंतर सराईत गेेले वर्षभर पोलिसांना गुंगारा देत होता. प्रथम नितीन मोहिते (वय २१, सध्या रा. शिवाजीनगर गावठाण, मूळ रा. खडकपुरा पेठ, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मोहिते याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी ‘मकोका’ कारवाई केली होती.

हत्याराचा धाक दाखवत जबरी चोरी – सविस्तर बातमी 

कारवाई केल्यानंतर तो पसार झाला होता. मोहिते याने मारहाण, धमकी देणे अशा प्रकारचे गु्न्हे फरार झाल्यानंतर केले होते. माेहिते हा बीड जिल्ह्यात असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला बीड परिसरातून अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेश माळगावे, पोलीस कर्मचारी रणजीत फडतरे, अमोल आवाड, मयूर भोकरे आणि पथकाने ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×