रक्तदान शिबिर व सामाजिक उपक्रमांनी अनिरुद्ध देशपांडे यांचा वाढदिवस साजरा

रक्तदान शिबिर व सामाजिक उपक्रमांनी अनिरुद्ध देशपांडे यांचा वाढदिवस साजरा

रक्तदान शिबिरातून ३२५ बाटल्या संकलित

marathinews24.com

पुणे – पुणे सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड अमनोराचे व्यवस्थापकीय संचालक, अमनोरा येस फाउंडेशनचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा व महानगर बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा व महानगर बॅडमिंटन संघटनेतर्फे शिवाजीनगर मधील संघटनेच्या बॅडमिंटन संकुलामध्ये रविवार ५ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . शिबिराला अतिशय चांगला प्रतिसाद प्राप्त झाला. आजवर विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांमधून एकूण ३२५ बाटल्यांचे संकलन करण्यात आले.

भटक्या विमुक्तांना सामाजिक, आर्थिक स्थैर्य मिळावे: उद्धव काळे – सविस्तर बातमी 

असोसिएशनचे सरचिटणीस रणजीत नातू, उपाध्यक्ष अविनाश जाधव, सुशील जाधव, स्पर्धा चिटणीस राजीव बाग, खजिनदार सारंग लागू, सल्लागार अतुल बिनीवाले, गिरीश नातू, अभय सोनवणे, सिटी ग्रुपचे मुख्य सामाजिक अधिकारी विवेक कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.

असोसिएशनतर्फे रक्तदान शिबिराचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. अनिरुद्ध देशपांडे यांच्या वाढदिवसानिमित्त अमनोरा येस फाउंडेशन तर्फे 25 मार्च ते 5 एप्रिल या दरम्यान विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये हडपसर मधील अमनोरा मध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये काम करणाऱ्या अवंतिकांची, घर कामगारांची आणि हाउसकीपिंग महिला कर्मचाऱ्यांची मिळून सुमारे 250 जणांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी करण्यात आली. तसेच 530 जणांची नेत्र तपासणी करून त्यापैकी 260 जणांना चष्मेवाटप, 30 जणांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि 400 जणांच्या सायरोमॅट्रिक तपासण्या करण्यात आल्या. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नर्सिंग कॉलेजमधील 32 विद्यार्थिनींना दहा लाख रुपयांच्या मीरा देशपांडे शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले, तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या 18 जणांना परशुराम पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या उपक्रमांमध्ये बीजे मेडिकल कॉलेज, ससून रुग्णालय, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज, एमईएसचे परशुराम रुग्णालय चारिटेबल ट्रस्ट चिपळूण, एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल, सिपला ब्रिद फ्री, जनकल्याण रक्त केंद्र, श्वास फाउंडेशन कोल्हापूर या संस्थांनी योगदान दिले. तसेच बीजे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर यल्लाप्पा जाधव, सर्जरी विभाग प्रमुख डॉ. लता भोईर, एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. राजेश शहा, परवेज बिलमोरिया, जितेश खरात, संजय कुलकर्णी, परशुराम मेडिकल हॉस्पिटलचे डॉ. सचिन उत्पात, डॉ. अनुपम अलमान, एमईएस नरसिंग काॅलेजचे प्राचार्य मिलिंद काळे, सिपला ब्रीद फ्रीचे प्रमोद अष्टेकर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर या सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी झाले होते.

रक्तदान शिबिरानिमित्त पुणे जिल्हा व महानगर बॅडमिंटन संघटनेचे सरचिटणीस रणजीत नातू म्हणाले, अनिरुद्ध देशपांडे यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्षपद अतिशय यशस्वीरिता सांभाळले आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार केले आहेत. त्यांचा या संघटनेला नेहमीच विविध प्रकारे सहकार्य लाभलेले आहे त्यांच्या या योगदानाच्या निमित्ताने संघटनेतर्फे दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.

सिटी ग्रुपचे मुख्य सामाजिक अधिकारी विवेक कुलकर्णी म्हणाले, अनिरुद्ध देशपांडे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांमध्ये शैक्षणिक, वैद्यकीय आदी विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांसाठी उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबिर, ब्रेस्ट कॅन्सर तपासणी, नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया असे उपक्रम घेण्यात आले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नर्सिंग कॉलेज मधील 32 विद्यार्थिनींना दहा लाख रुपयांची मीरा देशपांडे शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली. अमनोरा मॉल अमनोरा टाऊनशिप, चिपळूण मधील परशुराम हॉस्पिटल आणि पुणे महानगर बॅडमिंटन संघ या ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये सुमारे 325 बाटल्यांचे संकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×