Breking News
मराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दपुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरारपुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलेबेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावीजिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्नअल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हानपालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरणपुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्याकडून आढावाखुनासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला अटक

पुण्यात हॉटेलमधील हुक्का पार्लरवर छापा

हॉटेल मालक, मॅनेजर, वेटरसह ७ जणांवर गुन्हा

marathinews24.com

पुणे – शहरातील विमाननगरमधील ॲटलान्टिस रुफ टॉप लाऊंज हॉटेलमध्ये अ‍वैधरित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी दोनच्या पथकाने छापा टाकला. यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात हुक्का विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी, पोलिसांनी हॉटेल मालक, मॅनेजर, वेटरसह ७ जणांना पकडले असून, त्यांच्याविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यावेळी हॉटेलमधून हुक्का पॉट, विदेशी दारुच्या बाटल्या, व इतर साहित्य असा १ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पुण्यात ड्रग्ज सेवन करणार्‍यांची आयुक्तालयात परेड – सविस्तर बातमी

स्वप्निल शांताराम तांबे (वय ३२)अमेय मुकेश अजमीरे (वय २८ ,राहणार दोघे वाघोली), नवरंग विठ्ठलराव कोल्हे (वय २८ रा.विमाननगर), अमितकुमार दयालजी गोयल (वय २६ ) कमरुल इस्लाम लष्कर (वय २६) शिवमकुमार श्रीरामराज यादव (वय २३) माहरुफ अफताफउद्दीन आलम (वय १८ , सर्व राहणार सर्वजण खराडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

कोम्बिग ऑपरेशनच्या पार्श्र्वभूमीवर अमली पदार्थ विरोधी पथक दोन गस्तीवर होते. त्यावेळी ॲटलान्टिस हॉटेलमध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडीत रेजितवाड, सहायक पोलिस निरीक्षक नितीन नाईक, कर्मचारी राजेस शेख, पृथ्वीराज पांडुळे, संदीप देवकाते, दिनेश बास्टेवाड, सतीश चव्हाण, प्रशांत कळसकर, वैशाली माकडी यांच्या पथकाने छापा टाकून ७ जणांना ताब्यात घेतले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×