Breking News
मराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दपुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरारपुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलेबेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावीजिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्नअल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हानपालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरणपुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्याकडून आढावाखुनासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला अटक

मराठी वेब विश्वात पुन्हा एकदा गुंजणार ‘पौर्णिमेचा फेरा’; उत्कंठावर्धक दोन सीझननंतर आता धमाकेदार तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला!

मराठी वेब विश्वात पुन्हा एकदा गुंजणार 'पौर्णिमेचा फेरा'; उत्कंठावर्धक दोन सीझननंतर आता धमाकेदार तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला!

चित्तथरारक असलेली ‘पौर्णिमेचा फेरा सिझन ३’ वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर वेबसीरीजची चर्चा

marathinews24.com

पुणे – मराठी सिनेविश्वात आपल्या आगळ्यावेगळ्या कथानकाने आणि सस्पेन्स-थ्रिलरच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी वेब सिरीज ‘पौर्णिमेचा फेरा’ आता एका नव्या वळणावर येऊन पोहोचली आहे. पहिल्या दोन सीझनला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आणि प्रेक्षकांच्या आग्रहाखातर शुभम प्रोडक्शन फिल्म्स घेऊन येत आहे ‘पौर्णिमेचा फेरा सीझन ३’. शुभम प्रोडक्शन फिल्म्स या यूट्यूब चॅनेलवर या वेबसिरीजचा तिसरा भाग नुकताच प्रदर्शित झाला आहे. या वेबसिरीजला सोशल मीडियावर प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

अमृतच्या लक्षित गटातील परिवार सर्वेक्षण अभियानास प्रारंभ – सविस्तर बातमी 

थरार, उत्कंठा, शोध या नजरबंदीच्या खेळातून अनुत्तरीत प्रश्नांचा शोध घेणारी ‘पौर्णिमेचा फेरा’ ही मराठी वेब सिरीजचा तिसरा भाग ‘शुभम प्रोडक्शन फिल्म्स’ या चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. हास्यजत्रा कार्यक्रमातले विनोदवीर निखील बने आणि मंदार मांडवकर आपल्याला या वेब सिरीजमध्ये वेगळ्याच भूमिकेत पहायला मिळतात. त्यांना सिद्धेश नागवेकर या नव्या दमाच्या कलाकारासोबत, संदीप रेडकर, दीपा माळकर, प्राची केळुस्कर, निकिता बंदावणे, चंदन जमदाडे, संजय वैद्य, स्नेहल आयरे या सगळ्यांची साथ लाभली आहे. सगळ्या कलाकारांनी त्यांच्या भूमिका चांगल्या केल्या आहेत. ही वेब सिरीज बघताना प्रत्येकजण त्या त्या भूमिकेत चपखल बसलेला असल्याचं जाणवतं.

या वेब सिरीजची निर्मिती पायल गणेश कदम यांनी केली असून, दिग्दर्शनाची धुरा सचिन गोताड यांनी सांभाळली आहे. कथेचे संवाद आणि पटकथा संदेश लोकेगावकर यांची असून, छायाचित्रण कुणाल महादेव परडकर यांनी केले आहे. कार्यकारी निर्माता म्हणून हेमंत दिनकर पांचाळ लाभले आहेत. या सीरीजचे संकलन शिलंत कदम यांनी केले आहे. अनिरुद्ध निमकर याने संगीत दिले आहे.

रहस्याचा नवा प्रवास:

‘पौर्णिमेचा फेरा’ या वेब सिरीजची मांडणी इतर कथांपेक्षा वेगळी असल्यानेच ती अल्पावधीत लोकप्रिय झाली. पहिल्या सीझनमध्ये तीन मित्रांच्या गावी जाण्यापासून सुरू झालेला हा प्रवास एका खोल रहस्यात जाऊन अडकला. एका मित्राला वाचवण्याच्या प्रयत्नात सुरू झालेला हा खेळ दुसऱ्या सीझनमध्ये अधिक गडद आणि थरारक झाला. आता, जिथे दुसरा सीझन संपला, तिथूनच एका मोठ्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी सीझन ३ सज्ज झाला आहे.

Link – https://youtu.be/RaT9Ip_Jy4s?si=Xm-tW6f-2YYiquuq

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×