Breking News
‘जनगणना २०२७’ कल्याणकारी योजनांची सुनिश्चिती- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारबुद्ध पौर्णिमेनिमित्त ‘धम्म पहाट’ला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसादभोर तालुक्यात बालिकेवर अत्याचार करून खूनलाच मागितल्यापकरणी पोलीस उपनिरीक्षकाला अटकदारू पिण्याच्या वादातून मजुराच्या डोक्यात दगड घालून खून“संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा गौरव: संघर्षाने उभारलेला हे राज्य, आजची वास्तविकता!” – विशेष लेखजिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कार

खडकीत घर फोडले; साडे चार लाखांचा ऐवज चोरला

खडकीत घर फोडले; साडे चार लाखांचा ऐवज चोरला

बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी मारला डल्ला

marathinews24.com

पुणे – शहरातील घरफोड्यांचे सत्र कायम असून, चोरट्यांनी खडकी परिसरात बंद फ्लॅट फोडून साडे चार लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. भरदुपारी अवघ्या दोन तासात चोरट्यांनी ही चोरी केली आहे. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात ३५ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानूसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे.

दगडूशेठ मंदिरासमोर वाहतूक पोलिसाला मारहाण – सविस्तर बातमी 

तक्रारदार हे औंध रोडवरील श्री चेतन सोसायटी या इमारतीत राहण्यास आहेत. दरम्यान, सोमवारी दुपारी साडे चारच्या सुमारास ते काही कामानिमित्त घराला कुलूप लावून कुटूंबियासोबत बाहेर गेले होते. तेव्हा चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच, बेडरूममधील कपाटातून ४ लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला. तक्रारदार सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास परत आले असता त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. अधिक तपास पोलिस करत आहेत.

लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत देखील चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून गल्यातील १६ हजारांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी ४२ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास लोणी काळभोर पोलिस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×