Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

दगडूशेठ मंदिरासमोर वाहतूक पोलिसाला मारहाण

दगडूशेठ मंदिरासमोर वाहतूक पोलिसाला मारहाण

फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – ट्रिपलशीट निघालेल्या दुचाकीस्वारांना अडविल्यानंतर त्यांनी वाहतूक पोलिसांना आम्ही चळवळीचे कार्यकर्ते आहोत असे म्हणत वाद घातला. त्यानंतर त्यांना मारहाण करून गणवेशाची बटने तोडल्याची घटना घडली. दगडूशेठ मंदिरासमोर ही घटना भरदुपारी घडली. याप्रकरणी नितीन रामदास कराळे (वय २८) व संदिप दिनकर सोनवणे (वय ३४) यांच्यासह इतर एकावर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस अंमलदार सोहेल शेख यांनी तक्रार दिली आहे.

पुणे विमानतळावर ३३ लाखांचा गांजा जप्त; प्रवाशाला अटक – सविस्तर बातमी 

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे फरासखाना वाहतूक विभागात नेमणूकीस आहेत. ते मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास दगडूशेठ मंदिरासमोर वाहतूक नियमन करत होते. तेव्हा अचानक त्यांना एका दुचाकीवर ट्रिपलशीट जात असल्याचे दिसले. त्यांनी गाडी अडविली. तेव्हा या आरोपींचा राग अनावर झाला. त्यांनी थेट आमची गाडी का अडवली, असे म्हणत त्यांची कॉलर पकडली. तु आम्हाला ओळखत नाही, आम्ही चळवळीचे कार्यकर्ते आहोत. तुला गाडी अडविण्याचा काय अधिकार आहे. असे म्हणत शिवीगाळ केली. त्यांच्याशी झटापट केली. यामध्ये तक्रारदार यांच्या गणवेशाचे बटन तुटले गेले. त्यांना हाताने मारहाण देखील केली. त्यांना ढकलून दिले असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक मोकाशी हे करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×