Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

पुणे विमानतळावर ३३ लाखांचा गांजा जप्त; प्रवाशाला अटक

 पुणे विमानतळावर २६ कोटी ८० लाखांचा ‘हायड्रोपोनिक गांजा’ जप्त

कार्बन पेपर-व्हॅक्यूम पॅकिंगचा वापर करून तस्करीचा प्रयत्न फसला; पुणे विमानतळावर कारवाई

marathinews24.com

पुणे – बँकॉकहून पुण्यात येणाऱ्या विमानातून गांजाची तस्करी करण्याचा प्रयत्न एअर इंटेलिजन्स युनिटने उधळून लावला आहे. आरोपीने अत्याधुनिक पद्धतीने कार्बन पेपर व व्हॅक्यूम पॅकिंगमध्ये गांजा लपवून आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्याचा डाव फसला आहे. कस्टम विभागाने अंजिल मुथिप्पलाथिंकल मजीद (वय २०, रा. त्रिशूर, केरळ) याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ९६० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. या गांजाची आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारातील किंमत ३३ लाख ६० हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

पुण्यात अपघातात आयटी इंजिनिअर तरुणीचा मृत्यू – सविस्तर बातमी

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा बँकॉकहून एअर इंडिया एक्सप्रेसच्या IX-241 या विमानाने पुणे विमानतळावर आला होता. उतरल्यानंतर त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने त्याला थांबवून चौकशी केली. प्रथम आरोपीची झडती घेतली असता काही आढळले नाही. मात्र त्याच्या बॅगेची तपासणी केल्यावर काळ्या बॅकपॅकमध्ये कपड्यांच्या आत लपवलेले दोन पॅकेट आढळले. हे पॅकेट कार्बन पेपरमध्ये गुंडाळून व्हॅक्यूम सील करण्यात आले होते, जेणेकरून त्याचा वास बाहेर येऊ नये. तसेच स्कॅनिंगमध्ये सहज दिसू नये. पॅकेट उघडल्यावर त्यात हिरव्या रंगाचा पदार्थ आढळला. ड्रग टेस्ट किटद्वारे तपासणी केली असता तो हायड्रोपोनिक गांजा असल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक चौकशीत आरोपी हा गांजा भारतात आणून विक्री करण्याच्या उद्देशाने तस्करी करत असल्याचे समोर आले आहे.

आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत कलम 8(सी), 20(बी)(ii)(A) व 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला 4 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजता अटक करण्यात आली असून त्याला पुढील तपासासाठी वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×