Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

पुण्यात अपघातात आयटी इंजिनिअर तरुणीचा मृत्यू

पुण्यात अपघातात आयटी इंजिनिअर तरुणीचा मृत्यू

टँकरच्‍या चाकाखील येऊन जागीच मृत्यू

marathinews24.com

पुणे – टँकरने दुचाकीला धडक दिल्यानंतर तरुणी चाकाखाली आल्याने झालेल्या अपघातात २२ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ( दि. ७) सकाळी वानवडी परिसराती गंगा सॅटेलाईट सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला आहे. चाक घरून कंपनीत जाण्यासाठी निघाल्यानंतर सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला. ग्रेसिया डॅनिअल इसा (वय २२, रा.रा. नॅन्सी टॉवर, केदारी पेट्रोल पंपासमोर, वानवडी) असे अपघातात मृत्‍यू झालेल्‍या तरूणीचे नाव आहे. याप्रकरणी टँकर चालक संतोषकुमार इंद्रदेवप्रसाद मौर्या (वय ४५, रा. नेताजीनगर, वानवडी, मुळ रा. रजौली, जि. नवादा, राज्‍य बिहार) याला अटक केली आहे. गिता डॅनिअल इसा (वय ४९, रा. नॅन्सी टॉवर, केदारी पेट्रोल पंपासमोर, वानवडी) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

साताऱ्यात ज्येष्ठ महिलेची फसवणूक करणारा चोरटा अटकेत – सविस्तर बातमी 

पोलिसांच्या माहितीनुसार, ग्रेसिया ही इंजिनिअर होती. ती नांदेड सिटी येथील कंपनीत नोकरीस होती. तिच्‍या कामाची वेळ ही ९ ते सायंकाळी साडेसात अशी होती. मंगळवारी तिला ऑफीसमध्ये लवकर बोलावले होते. यामुळे ती सकाळी आठच्या सुमारास तिच्या दुचाकीवरून घराबाहेर पडली. वानवडी येथील गंगा सॅटेलाईट समोरील रोडवरून जात असताना भरधाव वेगात असलेल्‍या पाण्याच्‍या टँकरेने तिच्‍या दुचाकीला धडक दिला. त्यात ती खाली पडली. काही समजण्याच्या आतच टँकरचे पाठिमागील चाक तिच्‍या डोक्‍यावरून गेले. तिला तात्‍काळ ससून रूग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच तिचा मृत्‍यू झाल्‍याचे घोषीत करण्यात आले. याप्रकरणी ट्रक चालकाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

भल्या सकाळी घडलेल्या या अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली होती. तर, नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. ग्रेसिया नुकतीच नोकरीस लागली होती. तिचे वडिल चेन्नई येथे नोकरीस असतात. तर, आई मगरपट्टा सिटी येथे एक कॅफे चालविते. मुलीच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटूंबावर मोठा आघात झाला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×