Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पीपीएफ स्टेटमेंटच्या बहाण्याने लिंक पाठवून फसवणूक

पीपीएफ स्टेटमेंटच्या बहाण्याने लिंक पाठवून फसवणूक

ज्येष्ठ महिलेचे १४.५ लाख लंपास

marathinews24.com

पुणे – पीपीएफ खात्याचे स्टेटमेंट मिळवून देण्याच्या बहाण्याने लिंक पाठवून मोबाइल हॅक करत ज्येष्ठ नागरिक महिलेची १४ लाख ५० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. औंध परिसरात राहणाऱ्या ६५ वर्षीय महिलेने याबाबत तक्रार दिली आहे. हा प्रकार सात एप्रिलला घडला आहे.

चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आपल्या घरी असताना पंजाब नॅशनल बँकेच्या कॅम्प शाखेतील पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) खात्याचे स्टेटमेंट मिळवण्यासाठी त्यांनी गुगलवरून मिळालेल्या एका अनोळखी क्रमांकावर संपर्क साधला. संबंधित व्यक्तीने स्वतःचे नाव अजय कुमार असे सांगून व्हॉट्सअ‍ॅप कॉलद्वारे संवाद साधला.

आरोपीने स्टेटमेंटच्या नावाखाली एक लिंक पाठवून ती उघडण्यास सांगितले. लिंक उघडल्यानंतर इंटरनेट आणि सर्व्हर समस्या असल्याचा बनाव करण्यात आला. प्रत्यक्षात त्या लिंकद्वारे तक्रारदाराचा मोबाइल हॅक करण्यात आला. या प्रक्रियेतून आरोपींनी त्यांच्या खात्यातील १४ लाख ५० हजार रुपये काढून घेत आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणात संबंधित मोबाइल क्रमांकधारक, व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्ते तसेच बँक खात्यांचे धारक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास चतुश्रृंगी पोलिस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×