Breking News
ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीकडून गोळीबार; दोघे जखमीकेंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते लिंगभाव समावेशनावरील आशियातील पहिल्या युनेस्को अध्यासनाचे उद्घाटनमराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दपुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरारपुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलेबेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावीजिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्नअल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हानपालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरण

दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

मुंबई-बंगळुरू मार्गावरील घटना

marathinews24.com

पुणे – भरधाव दुचाकीच्या धडकेत दुसऱ्या दुचाकीस्वार 37 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना भूमकर पूल, नऱ्हे येथे घडली आहे. अमरजा गोपाळ हांडे (वय 37, रा. गोकुळनगर, वारजे) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या 17 वर्षीय मुलीने नऱ्हे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार साहिल सुनील कवडे (वय 22, रा. लिपाणे वस्ती, जांभुळवाडी, आंबेगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 9 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता मुंबई–बंगळुरू महामार्गावर साताऱ्याच्या दिशेने भूमकर पूल, नऱ्हे येथे घडली आहे.

हत्याराचा धाक दाखवून जबरी चोरी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या आई आणि भावासोबत मुंबई–बंगळुरू महामार्गावर दुचाकीने जात होत्या. त्यावेळी कवडे याने भरधाव वेगात दुचाकी चालवत ग्रॅड्युअर सोसायटीसमोर तक्रारदार असलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात तक्रारदार यांच्यासह त्यांचा भाऊ आणि आई जखमी झाल्या होत्या. अमरजा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक तुपसौंदर करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×