दोघांना बेड्या; डेक्कन पोलिसांची कारवाई
marathinews24.com
पुणे – बहिणीसोबत पायी जाणाऱ्या एका तरुणाला मारहाण करत फोनपेवरून पैसे घेत जबरी चोरी करणाऱ्या दोघांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. निखील संदीप जाधव (वय 20, रा. जनता वसाहत) आणि ओंकार रमेश गरुड (वय 21, रा. गंजपेठ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी नागेश हनुमंत पाटील (वय 21, रा. सदाशिव पेठ) यांनी तक्रार दिली आहे.
पैसे पाठविल्याचा बनावट मेसेज दाखवून मोबाईल खरेदी; गुन्हा दाखल – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे 10 एप्रिल रोजी मावस बहिणीसोबत पायी चालत होते. यावेळी नदीपात्रातील पुलावर मध्यभागी आले असता दोन दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांना अडविले. लोखंडी हत्याराचा धाक दाखवून तक्रारदार यांच्या मोबाईलमधून फोनपेवरून 1 हजार रुपये ट्रान्सफर करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.





















