Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पैसे पाठविल्याचा बनावट मेसेज दाखवून मोबाईल खरेदी; गुन्हा दाखल

पेट्रोल पंपात भागीदारीच्या आमिषाने २ कोटी २९ लाखांची फसवणूक

कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – दुकानदाराला पैसे बँक खात्यात पाठविल्याचा बनावट मेसेज दाखवून 1 लाख 35 हजार रुपयांचा मोबाईल खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फारुख अत्तार शेख (वय 37, रा. कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आदित्य विनोद गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 11 मार्च रोजी घडली आहे.

शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य; रिक्षाचालक अटकेत – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोंढव्यातील आर. आर. कम्युनिकेशन या मोबाईल विक्री करणाऱ्या दुकानात काम करतात. गायकवाडने सॅमसंग कंपनीचा अल्ट्रा 26 हा मोबाईल खरेदी करणार असल्याचे सांगितले. यावेळी त्याला या मोबाईलवर ऑफर सुरू असून तो 1 लाख 34 हजार 999 रुपयांना असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी गायकवाडने मोबाईल शॉपीच्या बँक खात्यावर एनईएफटीच्या माध्यमातून पैसे पाठवत असल्याचे सांगून एका तासात पैसे जमा होतील असे सांगितले आणि त्याच्या मोबाईलवरील मेसेज दाखवला. त्यामुळे तक्रारदार यांनी गायकवाडला मोबाईल दिला. मात्र, गायकवाडने पैसे बँक खात्यात आले नसल्याचे सांगितल्यानंतर वेगवेगळी कारणे देऊन तक्रारदारांना पैसे पाठविले नाहीत.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रार देण्यात आली आहे.याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक खोपडे करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×