Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

बाह्यवळण मार्गावर अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

अपघातात तिघे जखमी

marathinews24.com

पुणे – भरधाव दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर भूमकर पूल परिसरात घडली. अपघातात दुचाकीस्वार तरुणासह तिघे जण जखमी झाले आहेत. अमरजा गोपाळ हांडे (वय ३७, रा. गोकुळनगर, वारजे) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार साहिल सुनील कवडे (वय २२, रा. लिपाणे वस्ती, जांभुळवाडी, आंबेगाव) गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अमरजा यांची मुलगी अस्मिता (वय १७) हिने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अत्याचार झालेल्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अस्मिता, तिची आई अमरजा आणि भाऊ हे मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन ९ एप्रिल रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास निघाले होते. नऱ्हे परिसरातील भूमकर पुलाजवळ दुचाकीस्वार साहिल कवडे हा भरधाव वेगाने निघाला होता. दुचाकीस्वार कवडे याचे नियंत्रण सुटले आणि दुचाकीस्वार अस्मिताला धडक दिली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी अमरजा, त्यांचा मुलगा हे जखमी झाले. अमरजा, तसेच दुचाकीस्वार कवडे याला गंभीर दुखापत झाली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या अमरजा यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. अपघातात कवडे हा गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीस्वार अस्मिता आणि तिच्या भावाला दुखापत झाली. भरधाव दुचाकी चालवून अपघातास जबाबदार ठरल्या प्रकरणी कवडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक तूपसौंदर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×