तिघे जण अटकेत
marathinews24.com
पुणे – हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून एकाचा खुनाचा प्रयत्न करुन पसार झालेल्या तिघांना गुन्हे शाखेने अटक केली. रेहान उर्फ खिमा फिराेज शेख (वय २०), गौरव गणेश गुजर (वय २०), अतिक हारून अत्तार (वय २१, तिघे रा. काशेवाडी, भवानी पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.
विवाह मोडल्याने तरुणीचा खून – सविस्तर बातमी
आरोपींनी एकाकडून हातउसने पैसे घेतले होते. शंकरशेठ रस्त्यावरील धोबीघाट परिसरात ४ एप्रिल रोजी आरोपी आणि तक्रादारामध्ये पैशांवरुन वाद झाला. त्यानंतर आरोपींनी तक्रादारावर पिस्तूल रोखून त्याला मारहाण केली होती. तक्रारदाराबरोबर असलेल्या भाच्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी त्यांना मारहाण केली होती. पसार झालेल्या आरोपींचा गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून शोध घेण्यात येत होता. पसार झालेल्या आरोपींची माहिती पोलीस कर्मचारी सद्दाम तांबोळी आणि अझीम शेख यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्यांना पकडले.
पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, शंकर नेवसे, साधना ताम्हाणे, नागनाथ राख, उज्ज्वल मोकाशी, शंकर कुंभार, विशाल दळवी, विनोद चव्हाण, संजय सरगर यांनी ही कारवाई केली.





















