Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

विवाह मोडल्याने तरुणीचा खून

व्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खून

एकाला जन्मठेप

marathinews24.com

पुणे – विवाह मोडल्याच्या कारणावरुन तरुणीवर चाकूने वार करुन खून करणाऱ्या एकाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश हर्षल भालेराव यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शरीफ रज्जाक शेख (वय २७, रा. अश्रफनगर, कोंढवा बुद्रुक) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. आरोपी शेख याचा नाझनीन सादिक शेख (वय १८, रा. गणेश पेठ) हिच्याशी २०१८ मध्ये विवाह निश्चित करण्यात आला होता. काही कारणांवरुन विवाह मोडल्याने शेख तरुणीवर चिडला होता.

डेक्कन नदीपात्रात तरुणाला धमकावून लुटणारे गजाआड – सविस्तर बातमी

२३ जुलै २०१९ रोजी गणेश पेठेतील तरुणीच्या राहत्या घरात आरोपी शेख शिरला. त्याने तिच्यावर चाकूने वार केले. त्या वेळी तिची आई फैमिदा (वय ४५) यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शेखने नाझनीनच्या आईवर चाकूने वार केले. त्याने केलेल्या हल्ल्यात फैमिदा जखमी झाल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघींना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान नाझनीनचा मृत्यू झाला. फैमिदा यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणी शेख याला अटक करण्यत आली. त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले.

या खटल्यात सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील संजय पवार यांनी नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. या खटल्यात नाझनीनची आई फैमिदा आणि शेजाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. ‘आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून, त्याला कठोर शिक्षा सुनावण्यात यावी’, अशी विनंती सरकारी वकील पवार यांनी युक्तिवादात केली.

न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपीला जन्मठेप आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.घटनास्थळावरुन जप्त केलेल्या चाकूवर आरोपीच्या बोटांचे ठसे आढळले नाहीत, आरोपींनी तरुणी, तसेच तिच्यावर आईवर हल्ला केला, असे म्हणणे योग्य ठरणार नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला होता. न्यायालयाने बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद फेटाळून लावला. चाकू रक्ताने माखला असल्याने बोटांचे ठसे पुसले जाण्याची दाट शक्यता असते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवून बचाव पक्षाचा युक्तिवाद फेटाळून लावला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×