Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

डेक्कन नदीपात्रात तरुणाला धमकावून लुटणारे गजाआड

कोथरूडमध्ये १७ वर्षीय मुलाच्या खुनाचा दोन तासांत छडा

डेक्कन पोलीस ठाण्यात केली होती तक्रार

marathinews24.com

पुणे – स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाला धमकावून लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. निखिल संदीप जाधव (वय २०, मारुती मित्र मंडळाजवळ, जनता वसाहत), ओंकार रमेश गरुड (वय २१, रा. महात्मा फुले वाड्याजवळ, महात्मा फुले पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका तरुणाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लैंगिक छळ प्रकरणात खासगी कंपनीतील अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. तो आणि त्याची मावस बहीण हे शुक्रवारी (१० एप्रिल) सायंकाळी पाचच्या सुमारास नदीपात्रातील रस्त्याने निघाले होते. त्या वेळी आरोपी जाधव आणि गरुड हे दुचाकीवरुन तेथे आला. तक्रारदार तरुणाला आणि त्याच्या मावस बहीणीला कोयत्याचा धाक दाखविला. तरुणाला धमकावून पैसे मागितले. कोयत्याचा धाक दाखवून तरुणाकडून आरोपींनी ऑनलाइन पद्धतीने एक हजार रुपये घेतले. आरोपी दुचाकीवरुन पसार झाले. घाबरलेल्या तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन दोघा आरोपींना ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×