Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

५० पुस्तकांचे एकत्र प्रकाशन; जागतिक विक्रमाची नोंद

एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये समावेश

marathinews24.com

पिंपरी-चिंचवड – वेलवेट पब्लिकेशन आणि झेप सामाजिक संस्था यांच्या पुढाकारातून ४४ लेखकांची ५० पुस्तके एकाच वेळी प्रकाशित करून अनोखा जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यात आला. या उल्लेखनीय उपक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. साहित्यप्रेमींच्या मोठ्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.

मुळा-मुठा नदी स्वच्छतेसाठी राबविण्यात येणारे प्रकल्प गतीने पूर्ण करा-मंत्री पंकजा मुंडे – सविस्तर बातमी 

सांगवी येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात रविवारी आयोजित कार्यक्रमात हा विक्रम साकार झाला. या प्रसंगी लेखिका रोहिणी निनावे, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद असलेल्या गायिका मंजुश्री ओक, पत्रकार-समीक्षक सौमित्र पोटे तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी अशोक आदक उपस्थित होते. वेलवेट पब्लिकेशनच्या संस्थापक वर्षा विशाल ठुकरूल आणि सिंधू बागवे यांनी कार्यक्रमाचे नेतृत्व केले. विक्रमाची अधिकृत घोषणा करत अशोक आदक यांनी प्रशस्तीपत्र प्रदान केले.

या उपक्रमात ९ ते ८० वयोगटातील लेखकांचा सहभाग लक्षणीय ठरला. कथासंग्रह, काव्यसंग्रह, कादंबरी, विनोदी साहित्य, चारोळ्या आणि बालसाहित्य अशा विविध प्रकारच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

प्रास्ताविकात वर्षा ठुकरूल यांनी सांगितले की, नवोदित लेखकांना व्यासपीठ मिळावे यासाठी वेलवेट पब्लिकेशन कार्यरत असून ‘ना नफा, ना तोटा’ या तत्वावर प्रकाशन केले जाते. गेल्या दहा महिन्यांत ६५ पुस्तके प्रकाशित झाली असून आजच्या कार्यक्रमातील अनेक लेखकांचे हे पहिलेच पुस्तक आहे.

अशोक आदक यांनी या विक्रमाचे कौतुक करताना साहित्यनिर्मितीसाठी वय किंवा व्यवसाय अडसर ठरत नाही, हे या उपक्रमातून स्पष्ट झाल्याचे सांगितले. रोहिणी निनावे यांनी प्रत्येकामध्ये दडलेल्या लेखकाला वाव देण्याची गरज अधोरेखित केली. सौमित्र पोटे यांनी बोलीभाषेतील लेखनाचे महत्त्व विशद केले, तर मंजुश्री ओक यांनी वाचन-लेखनाच्या माध्यमातून ज्ञानप्रसाराची गरज अधोरेखित केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मृणाल धोंगडे यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×