Breking News
मराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दपुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरारपुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलेबेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावीजिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्नअल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हानपालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरणपुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्याकडून आढावाखुनासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला अटक

मुळा-मुठा नदी स्वच्छतेसाठी राबविण्यात येणारे प्रकल्प गतीने पूर्ण करा-मंत्री पंकजा मुंडे

मुळा-मुठा नदी स्वच्छतेसाठी राबविण्यात येणारे प्रकल्प गतीने पूर्ण करा-मंत्री पंकजा मुंडे

मुळा-मुठा नदी स्वच्छतेसाठी राबविण्यात येणारे प्रकल्प गतीने पूर्ण करावे – मंत्री पंकजा मुंडे

marathinews24.com

पुणे – राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी ​मुळा-मुठा नदीला प्रदुषणाच्या विळख्यातून मुक्त करण्याच्यादृष्टीने आज मुंढवा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र तसेच भैरोबा नाला सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या परिसराची पाहणी केली; मुळा-मुठा नदी स्वच्छतेसाठी राबविण्यात येणारे प्रकल्प गतीने पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी – सविस्तर बातमी 

यावेळी अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर आदी उपस्थित होते. मुंडे म्हणाल्या, मुळा-मुठा नदीला प्रदूषणातून मुक्त करणे आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावा.

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहणार असून प्रदूषणाचे मूळ शोधून त्यावर तांत्रिक आणि प्रशासकीय पातळीवर ठोस पावले उचलावीत. मुळा-मुठा नदीत प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जाणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

पुण्यातील सांडपाणी प्रक्रियेची गती वाढवण्यासाठी भैरोबा नाला येथील प्रकल्पाचा संबंधित अधिकाऱ्यांच्या कडून आढावा घेतला. पर्यावरणाचे रक्षण करणे ही केवळ सरकारचीच नाही, तर आपलीही जबाबदारी आहे. नदीत कचरा टाकणे थांबवूया, पुण्याचे वैभव वाचवूया, असे आवाहन मंत्री मुंडे यांनी पुणे करांना उद्देशून केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×