Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुण्यात १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘संयुक्त अभिवादन’

राज्य व केंद्रातील मान्यवरांची उपस्थिती; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती, पुणे’ यांच्या वतीने मंगळवार, १४ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता भव्य ‘संयुक्त अभिवादन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्य शासनातर्फे तीन दिवसीय वारकरी साहित्य संमेलन घेणार – सविस्तर बातमी

या कार्यक्रमात राज्य व केंद्र सरकारमधील मंत्री, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र येऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत.

या सोहळ्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, पार्थ पवार, मेधा कुलकर्णी यांच्यासह पुण्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.

तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा हे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय विविध पक्षांचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे (काँग्रेस), धिरज घाटे (भाजप), सुनील टिंगरे (राष्ट्रवादी काँग्रेस), गजानन थरकुडे (शिवसेना उ.बा.ठा.), रवींद्र धंगेकर (शिवसेना) आणि श्रीकांत पाटील (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी) हेही उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाचे नियोजन उपमहापौर परशुराम वाडेकर, अध्यक्ष राहुल डंबाळे, डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक अविनाश साळवे आणि बाळासाहेब जानराव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. पुणे शहर व परिसरातील नागरिकांनी या अभिवादन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामानवाला अभिवादन करावे, असे आवाहन जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×