Breking News
मराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दपुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरारपुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलेबेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावीजिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्नअल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हानपालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरणपुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्याकडून आढावाखुनासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला अटक

पुण्यात नशेत तरूणाच्या अंगावर चढविली मोटार, आरोपी अटकेत

फुरसुंगी पोलिसांनी अटक

उरळी देवाची परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – दारूच्या नशेत भरधाव मोटार तरूणाच्या अंगावर चढवून त्याला काही अंतर फरफटत नेले. त्यानंतर त्याच्या अंगावरून गाडी चालवून तरूणाला गंभीर जखमी केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मद्यपी वाहन चालकाला फुरसुंगी पोलिसांनी अटक केली आहे. हा अपघात १२ एप्रिलला रात्री साडेबाराच्या सुमारास हडपसर सासवड रस्त्यावरील मामा भाजे हॉटेल समोर उरळी देवाची याठिकाणी घडला आहे.

पुण्यातील भवानी पेठेत वैमनस्यातून तरुणाचा खून – सविस्तर बातमी 

सागर बाळासाहेब सायकर (वय ४१, रा. शेवाळवाडी ) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कृष्णा गोपाळ कोईलवाड (वय ३०, रा. फुरसुंगी ) याला अटक करण्यात आली आहे. विजय तानाजी शिर्वेâ (वय ४१ रा. सातववाडी, हडपसर ) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा कोईलवाड हा १२ एप्रिलला मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मद्यपान करून वाहन चालवित होता. त्यावेळी त्याने उरळी देवाची परिसरात सागर सायकर याला मोटारीची धडक देउन बोनटवर पाडले. त्यानंतर त्याने सागरला काही अंतर फरफटत नेउन खाली पाडले. त्यानंतर त्याच्या अंगावरून मोटार चालवून सागरच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी आरोपी कृष्णाला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक कोमल जाधव तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×