पुण्यातील भवानी पेठेत वैमनस्यातून तरुणाचा खून

पुण्यातील भवानी पेठेत वैमनस्यातून तरुणाचा खून

चौघेजन अटकेत

marathinews24.com

पुणे – वैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची घटना भवानी पेठेतील काशेवाडी भागात घडली. याप्रकरणी खडक पोलिसांनी चौघांना अटक केली. अबूबकर अमजद खान (वय १८, रा. एडी कॅम्प चौक, नाना पेठ) असे् खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अम्मार शेख (वय १९, रा. चुडामण तालमीजवळ, भवानी पेठ), कमरअली सय्यद (वय १८, रा. विमाननगर), तुफेल सय्यद (वय १९), अबूझर कुरेशी (वय १८, रा. काशीवाडी, भवानी पेठ) यांना अटक करण्यात आली. याबाबत अल्तमश अन्सार पिंजारी (वय १९, रा. मोमीनपुरा, घोरपडे पेठ) याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फुरसुंगीत तरुणांच्या खुनाचा प्रयत्न; दोघे जखमी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबूबकर आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. अबूबकर आणि त्याचे मित्र शनिवारी (११ एप्रिल) काशीवाडी भागातील त्रिकोणी उद्यानाजवळ रात्री साडेदहाच्या सुमारास थांबले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांच्याकडे तीक्ष्ण शस्त्रे होती. आरोपींनी अबूबकर आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांना मारहाण केली. आरोपींनी अबूबकरवर शस्त्राने वार केले. अबूबकरला भोसकल्याने तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली.

गंभी जखमी झालेल्या अबूबकरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचाारदरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी पसार झालेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×