Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

पुण्यात फार्महाऊसवर छापा; हुक्का विक्री करणाऱ्यांवर कारवाई

७५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त

marathinews24.com

पुणे – शहरातील कोंढवा परिसरातील पिसोळी येथील फार्महाऊसवर छापा टाकून काळेपडळ पोलिसांनी बेकायदा हुक्का विक्री व सेवनाचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी ७५ लाख ८० हजार ७३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अनिस सय्यद व त्याचा साथीदार साद सय्यद यांच्यासह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोथरूडमध्ये तरुणावर शस्त्राने वार; तिघांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

अवैध धंदे, तडीपार आरोपी व गुन्हेगारांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्या आहेत. सूचनांनुसार काळेपडळ पोलिस ठाण्याचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार महादेव शिंदे आणि अतुल पंधरकर यांना गोपनीय माहिती मिळाली की, पिसोळी येथील आंबिका हॉटेल रोड, जगदंबा मार्ग परिसरातील फार्महाऊसमध्ये अनिस सय्यद व साद सय्यद हे बेकायदा हुक्का विक्री करत आहेत. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी छापा टाकला.

त्यावेळी तेथे ८ ते १० जण हुक्क्याचे सेवन करताना आढळले. कारवाईदरम्यान पोलिसांनी तीन चारचाकी, दोन दुचाकी, १२ मोबाईल, ८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर व इतर साहित्य असा एकूण ७५ लाख ८० हजार ७३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे पुढील तपास करत आहेत. ही कारवाई उपायुक्त जीवन बेनिवाल, सहायक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) अण्णासो बाबर यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे, उपनिरीक्षक रघुवीर खोडा तसेच पोलिस अंमलदार प्रवीण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतीक लाहीगुडे, शाहिद शेख, निलेश देसाई, अमोल फडतरे, अतुल पंधरकर, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीसकर, महादेव शिंदे, गिरीराज जगदाळे, नंदकुमार जावळे, ज्ञानेश्वर कुलाळ, अक्षय जगताप, शुभम पवार आणि मेघराज जाधव यांच्या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×