संततधार पावसामुळे भोर-महाडला जोडणाऱ्या वरंधा घाटातील शिरगाव भागात शुक्रवारी दरड कोसळली
marathinews24.com
पुणे – संततधार पावसामुळे सिंहगड किल्ला, वरंधा घाट, राजगड तालुक्यातील कुसगाव खिंड परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली. दरड कोसळल्यानंतर सिंहगड किल्ल्याकडे जाणारा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला. संततधार पावसामुळे भोर-महाडला जोडणाऱ्या वरंधा घाटातील शिरगाव भागात शुक्रवारी दरड कोसळली. दरड कोसळल्यानंतर वरंधा घाटमार्गे महाडकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली. या घटनेची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर जेसीबी यंत्राच्या सहायाने राडारोडा बाजूला काढण्यात आला. त्यानंतर मार्ग वाहतुकीस खुला करून देण्यात आला.
सिया आणि चेतनची न्यायालयीन कोठडीत रवानगी – सविस्तर बातमी
सिंहगड किल्ला परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली. त्यानंतर हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला. सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला. घाट रस्त्यावरील डोंगर कपारातील दगड संततधार पावसामुळे सैल झाले आहेत. त्यामुळे हा भाग धोकादायक झाला. सिंहगड किल्ला परिसरातील दरड काढण्याचे सायंकाळपर्यंत सुरू होते.
राजगड तालुक्यातील कुसगाव खिंडीत दरड कोसळल्याची घटना घडली. खिंडीत पडलेले दगड जेसीबी यंत्राच्या सहायानेन बाजूला काढण्यात आल्यानंतर मार्ग खुला करून देण्यात आला आहे. पावसामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरपीएफ) पथके सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई, पुणे परिसरात सज्ज ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती ‘एनडीआरए”च्या अधिकाऱ्यांनी दिली.





















