Breking News
ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडीमहात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रमपुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाशअल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हाकात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाईदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटीलअंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलावविद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गतीडंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

विना लेबल व भेसळीच्या संशयावरून तुप व नमकीन या अन् पदार्थाचा साठा जप्त

पुण्यात पब्स, हॉटेल्सवर अन्न व औषध प्रशासनाचे छापे

आस्थापनेचा अन्न परवाना निलंबित- सह आयुक्त (अन्न्) दि.वा.भोगावडे

marathinews24.com

पुणे – अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात ‘सेफ फुड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ राबविण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासन पुणे विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेअंतर्गत मे. देवांश मिल्क अॅन्ड मिल्क प्रॉडक्टस, स नं. २१/१/३, शिव पार्वती अंगण, भालेकर नगर, पिंपळे गुरव, पुणे या आस्थापनेची तपासणीवेळी २३० कि.ग्रॅ. रुपये ९० हजार ५०० किंमतीचा साठा विना लेबल व भेसळीच्या संशयावरुन जप्त करण्यात आला. तपासणीदरम्यान आढळून आलेल्या त्रुटींची गंभीर दखल घेत ग्राहकांच्या आरोग्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने संबंधित आस्थापनेचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे.

सिंहगड एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक मारुती नवले यांच्याविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

अन्न सुरक्षा अधिकारी शि. ग. घाटोळ यांनी श्री. सा. सु. पटवर्धन, अक्षय शेळके यांच्या पथकाने विश्वजीत शिंदे, सहायक आयुक्त (अन्न) यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

पुणे विभागातील सोलापुर कार्यलयाकडून मे. संगीता फूड प्रॉडक्टस, मड्डे वस्ती, सोलापुर या आस्थापनेची सखोल तपासणी करुन नमकीन या अन्न पदार्थाचा १६० कि.ग्रॅ, किंमत रु. ३२ हजार किंमतीचा साठा लेबलमधील त्रुटी व भेसळीच्या संशयावरुन जप्त करण्यात आला. ही कारवाई साहेबराव देसाई, सहायक आयुक्त् (अन) यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी कि. घ. देशमुख यांनी केली.

“विनापरवाना अथवा नियमबाह्य पद्धतीने अन्न व्यवसाय करणाऱ्या तसेच दर्जाहीन, भेसळयुक्त अथवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्नपदार्थांचे उत्पादन, प्रक्रिया व विक्री करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनामार्फत यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती सह आयुक्त (अन्न्) दि.वा.भोगावडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×