Breking News
गोळीबार करणारा बिष्णोई टोळीतील एक जण ताब्यातपालखी सोहळ्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून पाच हजारांचा बंदोबस्तसिंहगड किल्ला, वरंधा घाटात दरड कोसळलीविवाह प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे आवाहनपवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबविणारसिया आणि चेतनची न्यायालयीन कोठडीत रवानगीआषाढी वारीसाठी मोठा बंदोबस्त- पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्लविना लेबल व भेसळीच्या संशयावरून तुप व नमकीन या अन् पदार्थाचा साठा जप्तसिंहगड एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक मारुती नवले यांच्याविरुद्ध गुन्हाअडीच कोटींचे सोने घेऊन कारागिर पसार

गोळीबार करणारा बिष्णोई टोळीतील एक जण ताब्यात

राजस्थान – पंजाब सीमेवर कारवाई

marathinews24.com

पुणे – शहरातील फुरसुंगी भागात पोलाद व्यावसायिकाच्या गोदामाबाहेर ५० कोटींच्या खंडणीसाठी गोळीबार करुन पसार झालेला लाॅरेन्स बिष्णोई टोळीतील एकाला पंजाब-राजस्थान सीमेवरुन ताब्यात घेण्यात आले. पवन राम असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. हडपसर-सासवड रस्त्यावरील उरळी देवाची परिसरात पोलाद व्यावसायिकाचे गोदाम आहे. आरोपी हा उरळी देवाची परिसरातील एका कंपनीत कामाला होता. त्याने पोलाद व्यावसायिकाची माहिती घेतली होती. २२ जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पोलाद व्यावसायिकाच्या गोदामासमोर आरोपीने पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना घडली होती.

सिया आणि चेतनची न्यायालयीन कोठडीत रवानगी – सविस्तर बातमी

लाॅरेन्स बिष्णोई टोळीच्या नावे त्याने पोलाद व्यावसायिकाकडे ५० कोटींची खंडणी मागितली होती. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात पोलाद व्यावासायिकाने तक्रार दिली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. फुरसुंगी, नाशिक फाटा, नाशिक, सूरतमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपास करुन खंडणी विरोधी पथकाने पसार झालेल्या आरोपीचा माग काढला. आरोपीला पंजाब-राजस्थान सीमेवरुन ताब्यात घेण्यात आले. स्थानिक न्यायालयाकडून पोलिसांनी प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) मिळवली असून, त्याला घेऊन पोलिसांचे पथक पुण्याकडे रवाना झाले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×