आदर्श शिक्षक भागवत सोनवणे यांची केंद्र प्रमुख पदी निवड

केंद्र प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक

marathinews24.com

बीड – अनंत जाधव केज तालुक्यातील उमरी येथील रहिवासी असलेले भागवत दादाराव सोनवणे यांची मुख्याध्यापक पदावरून केंद्र प्रमुख पदी जिल्हा परिषद प्रशासनाकडून नुकतीच पदोन्नती करण्यात आली आहे.  त्याबद्दल भागवत सोनवणे यांचे मित्रपरिवाराकडून आणि सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातून कौतुक होत आहे.

विशेष मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरत आहे ‘साहस फाउंडेशन’ – सविस्तर बातमी

आदर्श शिक्षक भागवत सोनवणे यांच्या घरची परिस्थिती बेताची आणि प्रतिकूल असल्याने संघर्ष हा त्यांच्या पाचवीलाच पुंजलेला होता, आई वडिलांची स्वप्ने साकार करण्यासाठी मनात जिद्द ठेवून कठीण परिश्रमातून सोनवणे यांनी आपले प्राथमिक व माध्यमिक चे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले. त्यांना लहानपणापासून मोठा अधिकारी बनायचे त्यांचे स्वप्न होते मात्र इ.स नव्वदच्या दशकात घरची परिस्थिती हलाखीची असल्याने आणि घरातील कोणी सुशिक्षित नसल्याने आणि मोठा अधिकारी बनण्यासाठी काय करावे लागते हे माहीत नव्हते आणि यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी त्यावेळी कोणी नसल्यामुळे अधिकारी होण्याचे स्वप्न अधुरे राहिले तरी भागवत सोनवणे यांनी हार न मानता आपले शिक्षण पुढे सुरू ठेवले. मेहनत, कष्ट अभ्यासात सातत्य ठेवत त्यांनी बी.ए, बी.एड ,एम.ए ,एम.एड अशा पदव्या संपादन करून तसेच सेट,नेट आणि टीईटी परीक्षेत यश संपादन करून १९९५ मध्ये शिक्षक भरती मध्ये भरती होऊन शिक्षक पदी भागवत सोनवणे नियुक्ती होऊन आपल्या आई वडिलांची स्वप्न साकार करून मान उंचावली.

त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिसेगाव येथे १२ वर्ष सेवा केली. मस्साजोग, शिंदी अन्य ठिकाणी उत्कृष्ट सेवा करत अनेक विद्यार्थी घडवले आहेत त्यांचे विद्यार्थी डॉक्टर, शिक्षक, पत्रकार, इंजिनिअर आणि शासकीय सेवेत विविध उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील सेवेला आता नुकतेच ३१ वर्ष पूर्ण झाले आहे.

जिल्हा परिषद शाळेचे सोनवणे यांच्यामुळे नाव लौकिक

आदर्श शिक्षक भागवत सोनवणे यांनी माझी हिरवी शाळा उपक्रम राबवून शाळेतील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करून नैतिक मूल्य संवर्धनासाठी विशेष नवोपक्रमास जिल्हास्तरीय पुरस्कार मिळवून, शाळेतील विद्यार्थी यांना Isro सारख्या परीक्षेसाठी पात्र केले आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत पारितोषक मिळवून दिले आहे.

तसेच शैक्षणिक साहित्य व विज्ञान प्रदर्शनासाठी राज्य स्तरावर सोनवणे यांच्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची निवड झाल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाचे नाव लौकीक केले आहे.

विषयतज्ञ म्हणून बी.आर.सी मध्ये उत्कृष्ट कामगिरी

सोनवणे यांनी जिल्हा परिषद शाळेत विशेष उल्लेखनीय कार्य आणि माझी हिरवी शाळा उपक्रम, मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा अशा शासनाचे विविध कार्यक्रम राबवल्या बद्दल जिल्हा परिषद बीड कडून या उत्कृष्ट सेवेबद्दल सोनवणे यांचे विशेष वेतनवाढ मंजूर करत जिल्हा परिषद प्रशासनाकडून सोनवणे यांची विषयतज्ञ म्हणून बी.आर.सी मध्ये नियुक्ती केल्यामुळे सहा वर्षे काम करायची संधी प्राप्त झाल्याने बी.आर.सी चे उत्कृष्ट काम अनुभवायला मिळाले आहे.

तसेच त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदी शिक्षक म्हणून काम करताना त्यांची मुख्याध्यापक पदावर नियुक्ती करण्यात आली होती त्यानंतर आता त्यांची नुकतीच जि.प चे केंद्र असलेल्या काळेगाव येथे केंद्र प्रमुख म्हणून पदोन्नती झाली आहे. त्यामुळे सोनवणे यांचे जिल्ह्यातील माजी विद्यार्थी, नातेवाईक, शिक्षक वृंद,मित्र परिवाराकडून पुढील कार्यासाठी सत्कार करून आणि सोशल माध्यमांवरून शूभेच्छा देऊन अभिनंदन केले जात आहे.

सोनवणे यांच्या शाळेत शिकलेले विद्यार्थी विविध पदावर

आदर्श शिक्षक भागवत सोनवणे यांनी जिल्हा परिषद शाळेत शिकवलेले विद्यार्थी सध्या सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रात विविध पदांवर कार्यरत आहेत त्यामध्ये डॉक्टर, पत्रकार, लेखक, इंजिनिअर, भारतीय सैनिक, पोलीस दलात आणि विशाल पांडूरंग मुळे हे लातूर येथे शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे भागवत सोनवणे यांना या सर्व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×