Breking News
केसांचा टोप लाउन घरफोड्या, सराईत टोळीचा पर्दाफाशविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला

पादचाऱ्यााच्या डोक्यात दगड मारुन रोकड लुटणारे अटकेत

पोलीस असल्याची बतावणी करुन १ कोटींची रोकड लूटण्याचा प्रयत्न

कोंढवा पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – पादचाऱ्याच्या डोक्यात दगड मारुन रोकड लुटणाऱ्या चोरट्यांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून ४ हजार ७०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. फरहान वसीम शेख (वय २१) फरहान अस्लम मलिक (वय १९, दोघे रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली हाेती. २८ जून रोजी फिर्यादी कोंढव्यातील ज्योती हाॅटेल चौकातील मैदानातून निघाले होते. त्यावेळी आरोपी शेख आणि मलिक यांनी फिर्यादीला अडवून त्यांना धक्का दिला. आरोपींनी त्यांच्या खिशातील पाकिट हिसकाविण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यात दगड मारला. त्यानंतर पाकिटातील चार हजार ७०० रुपयांची रोकड लुटून दोघे पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला.

पुण्यात फार्महाऊसवर छापा; हुक्का विक्री करणाऱ्यांवर कारवाई – सविस्तर बातमी

पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणावरुन चोरट्यांचा माग काढला. चोरटे कोंढव्यातील शिवनेरीनगर भागात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. चैाकशीत दोघांनी पादचाऱ्याला अडवून रोकड लुटल्याची कबुली दिली. चोरट्यांकडून चार हजार ७०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. परिमंडळ सहाच्या पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, उपनिरीक्षक रवींद्र गावडे, पोलीस कर्मचारी राहुल शेलार, पुष्पेंद्र चव्हाण, शाहिद राजपूत, अमोल हिरवे, सूरज शुक्ला यांनी ही कामगिरी केली.

रिक्षा चोरटा गजाआड

रिक्षा चोरणाऱ्या एकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली. चोरट्याकडून दोन रिक्षा जप्त करण्यात आल्या. जमीर उर्फ गुड्डू कादीर शेख (वय ४५, रा. मीठानगर, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शेख याने कोंढवा परिसरातून रिक्षा चोरली होती. पारगेनगर भागात तो थाबला होता. रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला संशयावरुन ताब्यात घेतले. चौकशीत त्याने रिक्षा चोरल्याची कबुली दिली. तपासात त्याच्याकडून दोन रिक्षा जप्त करण्यात आल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×