Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

दारूगोळा कारखान्यातील सुरक्षारक्षकाची गोळी झाडून आत्महत्या

दुभाजकावर दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू भरधाव

खडकी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

marathinews24.com

पुणे – खडकीतील लष्कराच्या दारूगोळा कारखान्यातील सुरक्षारक्षकाने बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. जगदीश राज (वय ५१) असे आत्महत्या केलेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पादचाऱ्यााच्या डोक्यात दगड मारुन रोकड लुटणारे अटकेत – सविस्तर बातमी

जगदीश राज हे मूळचे जम्मू काश्मिरमधील आहेत. राज हे लष्कराच्या ‘डिफेन्स कोअर सिक्युरिटी प्लाटून’ मध्ये नियुक्तीस होते. खडकीतील लष्कराच्या दारूगोळा कारखान्यात (ॲम्युनिशन फॅक्टरी) ते नियुक्तीस होते. रात्रपाळीत ते कामावर आले. त्यानंतर शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांनी रायफलमधून स्वत:वर गाेळी झाडून घेतली. गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर सहकाऱ्यांनी धाव घेतली. त्यांना तातडीने दारूगोळा कारखान्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच खडकी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. राज यांच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. या प्रकरणाचा तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

केतन अगरवालच्या आजोबांचे निधन

केतन अगरवाल याचे आजोबा देवीचंद अगरवाल यांचे शनिवारी सायंकाळी खासगी रुग्णालयात निधन झाले.

केतन याचा नियोजित पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी १८ जून रोजी लोहगडावरुन ढकलून खून केला. केतन याच्या खून प्रकरणाचा तपास सुरू असताना त्याचे आजोबा देवीचंद यांनी या प्रकरणाचा सखोल तपासाची मागणी केली होती. ‘केतन याचा खून करणाऱ्या आरोपींनी फाशीची शिक्षा व्हावी’, अशी मागणी त्यांनी केली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना त्यांची प्रकृती अस्वस्थ झाली. त्यांना बाणेरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×