Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

ओैषध विक्री दुकानातील कर्मचाऱ्याकडून १० लाखांचा अपहार

कोथरूडमध्ये टोळक्याचा राडा, पुर्ववैमनस्यातून तरूणावर वार

दुकानातील कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – ओैषध विक्री दुकानातील कर्मचाऱ्याने १० लाख रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांकडून ओैषध विक्री दुकानातील कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डाॅक्टरांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आकाश रामधन ढगे (रा. येवलेवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गळा आवळून सुरक्षारक्षक साथीदाराचा खून – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार डाॅक्टरांचे स्वारगेट भागातील मुकुंदनगर परिसरात ओैषध विक्री दुकान आहे. या दुकानात ढगे हा फार्मसिस्ट म्हणून कामाला आहे. ओैषध विक्रीतून जमा झालेल्या रक्कमेचा ढगे याने वेळोवेळी अपहार केला. गेल्या वर्षभरात त्याने १० लाख २६ हजार रुपयांचा अपहार केल्याचे डाॅक्टरांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील तपास करत आहेत.

व्यावसायिकाची सायबर चोरट्यांकडून फसवणूक

खासगी बँकेकडे क्रेडीट कार्ड घेण्याबाबत विचारणा करणाऱ्या व्यावसायिकाची सायबर चोरट्यांनी सहा लाख ६२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत व्यावसायिकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यावसायिक धनकवडीतील बालाजीनगर परिसरात राहायला आहेत. त्यांनी एका बँकेकडे क्रेडीट कार्ड मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार व्यावसायिक स्वत:ची माहिती ऑनलाइन पद्धतीने भरत होते. त्यासाठी त्यांनी दुसऱ्या क्रेडीट कार्डचा वापर केला. या कार्डची माहिती देत असताना सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून ६ लाख ६२ हजार रुपये लांबविले. वरिष्ठ पाेलीस निरीक्षक विठ्ठल पवार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×