Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

गळा आवळून सुरक्षारक्षक साथीदाराचा खून

पुण्यात प्रेम प्रकरणातून अल्पवयीनाचा खून

ड्युटीवेळी झोपण्याचा वाद जीवाशी

marathinews24.com

पुणे – रहिवाशी सोसायटीत ड्युटीला असताना झोपण्याच्या वादातून साथीदारानेच सुरक्षा रक्षकाचा गळा आवळून खून केला. ही धक्कादायक घटना १३ एप्रिलला रात्री अडीच वाजता खराडीतील स्पॅनोलाईफ सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी आरोपीला खराडी पोलिसांनी अटक केली आहे. पांडुरंग भाउराव खारवले (वय ५२, रा. म्हसोबा वस्ती मांजरी बुद्रूक) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुदर्शन माणिक काळे (वय २२, रा. तुळजाभवानीनगर, खराडी ) याला अटक केली आहे. बाळू पांडुरंग खारवले (वय ३०, रा मांजरी बुद्रूक) याने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तरुणाला शेअर मार्केटमधील गुंतवणूक पडली १७ लाखांना – सविस्तर बातमी 

सहायक पोलीस निरीक्षक साहेबा पोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी परिसरातील स्विट इंडिया चौकात स्पॅनोलाईफ रहिवाशी सोसायटी आहे. त्याठिकाणाी आरोपी सुदर्शन काळे आणि पांडुरंग खारवले सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होते. १३ एप्रिलला मध्यरात्रीच्या सुमारास झोपण्यावरून दोघांत वाद झाला होता. त्याच वादातून आरोपीने डोक्याला बांधलेला गमचाने पांडुरंगचा गळा आवळून खून केला. याप्रकरणाची माहिती मिळताच रहिवाशांनी पोलिसांना कळवले. त्यानुसार पोलिसांनी धाव घेत मृतदेह ससून रूग्णालयात दाखल केला. तर आरोपी सुदर्शनला ताब्यात घेत अटक केली. एपीआय साहेबा पोटे अधिक तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×