छळामुळे महिलेची पेट्रोल ओतून आत्महत्या

सासऱ्यासह दिराविरुद्ध गु्न्हा

marathinews24.com

पुणे – छळामुळे एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केल्याची घटना कात्रज भागात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सासऱ्यासह दिराविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत महिलेच्या बहिणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, सासरे हनुमंत काळे, दीर रतन (रा. वंडरसिटी सोसायटीजवळील झोपडपट्टी, कात्रज) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

उत्तर प्रदेशातील व्यावसायिकाचे अपहरण – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सासरे आणि दीर महिलेचा छळ करत होते. लाकडे फोडण्याच्या कारणावरुन तिला शिवीगाळ करण्यात आली होती. ११ एप्रिलला रात्री साडेआठच्या सुमारास अंगावर बाटलीत भरलेले पेट्रोल ओतले. पेट्रोल ओतून पेटवून घेतले. गंभीररित्या भाजलेल्या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तिच्या बहिणीने मंगळवारी (१४ एप्रिल) पोलिसांकडे तक्रार दिली. सासरे आणि दिराच्या छळामुळे आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×