Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

एकल महिलांसाठी जिल्हा परिषदेचा ‘माझे अस्तित्व’ महत्वाकांक्षी प्रकल्प

एकल महिलांसाठी जिल्हा परिषदेचा 'माझे अस्तित्व' महत्वाकांक्षी प्रकल्प

जिल्ह्यात १२० शिबीराचे आयोजन; ७० हजाराहून अधिक एकल महिला सहभागी

marathinews24.com

पुणे – महिला सक्षमीकरणाच्यादृष्टीकोनातून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून एकल महिलांसाठी ‘माझे अस्तित्व’ महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) आनंद खंडागळे यांनी दिली आहे.

जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग – सविस्तर बातमी 

या प्रकल्पाकरिता माहे ऑगस्ट २०२५ मध्ये जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील एकल महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये 1 लाख 9 हजार महिलांना सहभाग नोंदविला. एकल महिलासांठी महसूल मंडलनिहाय आयोजित एकूण १२० शिबीरात ७० हजार ५५८ एकल महिला सहभागी झाल्या होत्या. शासकीय योजनासाठी आवश्यक कागदपत्रे मिळवून देणे, शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती व लाभ देणे, आरोग्य तपासणी करणे, आवश्यक आरोग्य सुविधा पुरविणे, संदर्भ सेवा देणे आदी सेवा देण्यात आल्या.

बंधन व आयटीसी एनजीओमार्फत शिरुर तालुक्यात एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे यशस्वी कामकाज केले आहे. आजअखेर ६०० एकल महिलांना विविध प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. एकल महिलांना व्यवसायाच्यादृष्टीने आवश्यक साहित्याचा विनामूल्य पुरवठा करण्यात आला. त्यामध्ये भाजीपाला, फळे विक्री, शिवणकाम यासारख्या व्यवसायाचा समावेश आहे. व्यवसायाकरिता प्रत्येक एकल महिलेला व्यवसायाबाबतचे सहा महिने प्रशिक्षण देऊन देण्यात आले आणि यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केल्याचबाबतचे प्रमाणपत्र व व्यवसाय सुरु करणेसाठी कच्च्या मालाचा पुरवठा आदी बंधन व आयटीसी कंपनीच्या सीएसआर निधीतून देण्यात येत आहे.

‘माझे अस्तित्व’ योजनाअंतर्गत जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात ३ ,बारामती ६, भोर ९, दौंड १६ , हवेली ९, इंदापूर ६, जुन्नर ७, खेड १५, मावळ २२, मुळशी ११, पुरंदर ८, शिरुर ५, आणि वेल्हे तालुक्यात ३ याप्रमाणे १२० शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील तसेच महिला बालकल्याण सभापती अंकिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एकल महिला उपक्रम जिल्हा परिषदमार्फत आता अधिक प्रभावीपणे राबवण्याचे नियोजन केलेले असून याकरिता जिल्हा पातळीवर एकल महिलांकरता पोर्टल तयार करण्यात येऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी व पाठपुरावा प्रत्येक लाभार्थ्याचा करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. खंडागळे यांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×