Breking News
मराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दपुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरारपुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलेबेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावीजिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्नअल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हानपालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरणपुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्याकडून आढावाखुनासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला अटक

अतिक्रमण कारवाई करणाऱ्या निरीक्षकाला धक्काबुक्की

 खून केल्यानंतर कोयते उगारून आरोपींची दहशत

भाजी विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – अतिक्रमण विरोधी कारवाई करणाऱ्या महापालिकेतील सहायक निरीक्षकला भाजी विक्रेत्यांनी शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना हडपसरमधील हांडेवाडी परिसरात घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील सहायक निरीक्षक अमोल लावंड यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात नक्षलवादी कमांडर हिडमा माडवीच्या गाण्यावर नाच – सविस्तर बातमी 

शीतल महेश डांगे, रेखा सुदेश रोकडे, शाहिन मियाँसाहेब शेख, उषा दादाराव गायकवाड, सोनू सुदेश रोकडे (सर्व रा. हांडेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून गुुरुवारी (१६ एप्रिल) सायंकाळी सातच्या सुमारास हांडेवाडीतील भाजी विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत होती. त्यावेळी हांडेवाडी परिसरातील भाजी विक्रेत्या महिलांनी कारवाईस विरोध करुन लावंड यांना धमकावले. ‘तू महिलांना शिवीगाळ केली. तुझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करतो’, अशी धमकी दिली. त्यानंतर अतिक्रमण कारवाईस विरोध करुन लावंड यांच्या गाडीची काच एकाने फोडली. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी भाजी विक्रेत्या महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख तपास करत आहेत.

किरकोळ वादातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न

पुणे- किरकोळ वादातून तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून त्याचा खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना वारजे-एनडीए रस्त्यावरील शिवणे भागात घडली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून, चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
क्रिश सुरेंद्रसिंग (वय २०, रा. अचानक चौक, उत्तमनगर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत विशाल चंद्रकांत घोरपडे (वय ३६, रा. लक्ष्मी निवास, देशमुखवाडी, शिवणे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडे यांचा सरबत विक्रीचा व्यवसाय आहे. गुरुवारी (१६ एप्रिल) सायंकाळी पाचच्या सुमारास आरोपींनी वैमनस्यातून क्रिश याला शिवीगाळ करुन त्याला मारहाण केली. क्रिश याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. पसार झालेल्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×