Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

गॅस सिलेंडर वाहतुकीवरून वाद; चालकाला धमकावून ‘पत्रकाराने मागितली ५ हजारांची खंडणी

पुण्यात जेष्ठ फळविक्रेत्या महिलेला मोफत राशनचे आमिष, अडीच लाखांना लुटले

विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – गॅस सिलेंडर वाहतुकीदरम्यान कॅब चालकाला अडवून धमकावणे आणि स्वतःला पत्रकार तसेच राजकीय पदाधिकारी असल्याचे सांगत ५ हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सचिन चांदणे (रा. विमाननगर) आणि सनी पठाण (रा. रामवाडी हौसिंग सोसायटी, विमाननगर) यांच्यावर जबरदस्तीने पैसे उकळण्यासह धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला आहे. दिपक हरिभाऊ भवार (वय ५४, रा. पर्वती) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

कारवाईच्या भीतीने ज्येष्ठ महिलेची ४३ लाखांची फस‌वणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भवार हे कॅब चालक असून, ते स्वतःची गाडी चालवून उदरनिर्वाह करतात. मागील पाच वर्षांपासून ते विमाननगर येथील ‘सांबर हॉटेल’सागॅस सिलेंडर वाहतुकीवरून वाद; चालकाला धमकावून ‘पत्रकाराने मागितली ५ हजारांची खंडणीठी भाजीपाला आणि इतर साहित्य पुरवण्याचे काम करत आहेत. शनिवार (दि. १८ एप्रिल) रोजी सायंकाळी भवार हे हॉटेलमधील चार रिकामे गॅस सिलेंडर ‘प्रगती एजन्सी’कडे नेण्यासाठी गाडीत चढवत होते. त्याचवेळी दोन जणांनी रिक्षा आडवी लावून त्यांना अडवले. दोघांनी स्वतःला “पत्रकार आणि आरपीआयचे पदाधिकारी” असल्याचे सांगितले.

गाडीतून गॅस सिलेंडर नेणे बेकायदेशीर असल्याचा दावा केला. त्यानंतर त्यांनी भवार यांना शिवीगाळ करत दमदाटी केली आणि गाडी फोडण्याची धमकी दिली. त्यांनी हॉटेलचे सुपरवायझर सुभाष यांना बाजूला बोलावून ५ हजार रुपयांची मागणी केली. सनी पठाणने “मी पत्रकार असून आरपीआयचा उपाध्यक्ष आहे” असे सांगून दबाव टाकल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. घटनेनंतर भवार यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×