कारवाईच्या भीतीने ज्येष्ठ महिलेची ४३ लाखांची फस‌वणूक

कारवाईच्या भीतीने ज्येष्ठ महिलेची ४३ लाखांची फस‌वणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – कारवाईची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी सहकारनगर भागातील एका ज्येष्ठ महिलेची ४३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे.

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने ३३ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६८ वर्षीय ज्येष्ठ महिला संतनगर परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर काही दिवसांपूर्वी संपर्क साधला होता. नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यातून बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. बँक खात्याचा वापर काळ्या पैसे व्यवहारात झाला असून, या प्रकरणात पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची भीती चोरट्यांनी त्यांना दाखविली. त्यानंतर चोरट्यांनी अटकेची भीती दाखविली. अटक टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल, तसेच तातडीने पैसे भरावे लागतील, असे सांगितले. चाेरट्यांनी भीती दाखविल्याने तक्रारदार महिला घाबरल्या त्यांनी शहानिशा न करता चोरट्यांच्या खात्यात ८ ते १५ एप्रिल या कालावधीत वेळोवेळी पैसे जमा केले. चोरट्यांच्या खात्यात एकूण मिळून ४३ लाख सात हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×