Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

सोलापूर रस्त्यावर तरुणाचा खुनाचा प्रयत्न

खराडी, हडपसरमध्ये फ्लॅटमधून लॅपटॉप चोरीला

दोघेजण अटकेत

marathinews24.com

पुणे – तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील द्राक्ष संशोधन परिषदेसमोर घडली. याप्रकरणी मांजरी पोलिसांनी दोघांना अटक केली. गणेश नवनाथ कांबळे (वय ३३, रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. कुणाल राहुल चौगुले (वय १८), सुरेश बाबुराव गायकवाड (वय १८, दाेघे रा. लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर असलेल्या एका साथीदाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत कांबळेने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तडीपार केल्यानंतर बिबवेवाडीत दहशत माजविणारा गुंड गजाआड – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० एप्रिल रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास द्राक्ष संशोधन परिषदेसमोर मालवाहू टेम्पोचे चाक बदलण्याचे काम करत होते. त्यावेळी आरोपी दुचाकीवरुन तेथे आले. काही कारण नसताना आरोपींनी शिवीगाळ करुन कांबळे यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या घटनेत ते जखमी झाले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन चौगुले आणि गायकवाड यांना ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोेणे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×