Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

वाढदिवसाला गिफ्ट देण्याच्या बतावणीने महिलेला गंडा

पोलिसाची केली बतावणी, जेष्ठाला १ कोटींचा गंडा

सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मेट्रोमोनिअल साईटद्वारे झालेल्या ओळखीतून सायबर चोरट्याने महिलेला लग्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांना वाढदिवसाला परदेशातून गिफ्ट पाठवित असून, त्याची कस्टम ड्युटी भरण्याच्या नावाखाली तब्बल १७ लाख ५७ हजारांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. ही घटना १० फेबु्रवारी ते २६ मार्च कालावधीत वडगावमध्ये घडली आहे. याप्रकरणी महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नोकरानेच मारला डल्ला, ७ लाखांचा ऐवज चोरला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वडगावमध्ये राहायला असून, १० फेबु्रवारीला सायबर चोरट्याने महिलेला फोन केला. मेट्रोमोनिअल प्लॅटफॉर्मवरून बोलत असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संंपादित केला. त्यानंतर त्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून स्वतःचे घर, कार असल्याचे सांगून लवकरच हॉस्पीटल सुरू करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने महिलेला वाढदिवसानिमित्त गिफ्ट देणार असल्याची बतावणी केली. त्यासाठी कस्टम डयुटी भरावी लागेल, हे कारण देउन त्याने महिलेकडून १७ लाख ५७ हजार रूपये वर्ग करून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटणकर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×