Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

डेक्कन जिमखाना भागात मध्यरात्री दोन ठिकाणी आग

डेक्कन जिमखाना भागात मध्यरात्री दोन ठिकाणी आग

‘जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आणली आटोक्यात

marathinews24.com

पुणे – डेक्कन जिमखाना भागात मध्यरात्री दोन ठिकाणी आग लागण्याची घटना घडली. नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील हाॅटेल रुपालीजवळ कपड्यांच्या साठ्याला आग लागल्याची घटना घडली. डेक्कन जिमखाना परिसरातील एका माॅलच्या परिसरात पहाटे आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील (फर्ग्युसन रस्ता) हाॅटेल रुपालीजवळील गल्लीत कपडे विक्रीची दुकाने आहे. या भागात कपडे विक्रेते रस्त्यावर विक्री करतात. या भागातील एका पत्र्याच्या शेडमध्ये कपड्यांचा साठा ठेवण्यात आला होता. मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास पत्र्याच्या शेडमध्ये आग लागली. कपड्यांनी पेट घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर धूर झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या एरंडवणे केंद्रातील बंब घटनास्थळी दाखल झाला.

ज्येष्ठ नागरिकाची १ कोटी १७ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

अग्निशमन अधिकारी राजेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाल नाही. आगीमागचे कारण समजू शकले नाही’ अशी माहिती अग्निशमन अधिकारी राजेश जगताप यांनी दिली. त्यानंतर डेक्कन जिमखाना भागातील एका माॅलच्या आवारात पहाटे चारच्या सुमारास आग लागली. माॅलच्या आवारात ठेवलेल्या वस्तू, तसेच सिलिंगला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. वारजे भागात शुक्रवारी मध्यरात्री एका सोसायटीतील दुकानांना आग लागल्याची घटना घडली होती. २४ तासात शहरात तीन ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×