Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

ज्येष्ठ नागरिकाची १ कोटी १७ लाखांची फसवणूक

कस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

सायबर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची बतावणी करुन औंध भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी एक कोटी १७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे.

पोलीस चौकीत राडा; तिघांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक १३ मार्च ते २२ एप्रिल या कालावधीत घडली आहे. सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. समाज माध्यमातील संपर्क यंत्रणेचा वापर करुन चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. चोरट्यांनी पोलिसांसारखा गणवेश परिधान केला होता. एका दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची बतावणी चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाकडे केली. ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून दहशतवाद्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित झाल्याचे चोरट्यांनी सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाकडे अटक टाळण्यासाठी पैशांची मागणी केली.

घाबरलेल्या ज्येष्ठाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी एक कोटी १७ लाख ८७ हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करत आहेत. केंद्रीय तपास संस्थांच्या नावे कारवाईची भीती दाखवून गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांची विशेषत : ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटना वाढल्या आहेत. नागरिकांनी चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×