स्थानिक गुन्हे शाखा बीडची कारवाई
marathinews24.com
बीड (अनंत जाधव) – शेतकऱ्यांचे मोटर आणि वायर चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा बीड स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे बीड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तलावात व नदीमध्ये टाकलेल्या मोटारींचे वायर चोरीच्या घटना बीड, परभणी व जालना जिल्हयात सातत्याने सुरु होत्या. घटनांची माहिती मिळताच बीडचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक नवनीत कॅावत यांनी गांभिर्याने दखल घेतली.
लोहगाव भागात दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू – सविस्तर बातमी
धमेंद्र सुक्कल पारधी वय-२५ वर्षे रा,विलेगे बुठा पो.स्ट, सुगावन जि. कटनी राज्य मध्यप्रदेश २) शेख शफीक शेख बाबु वय-२५ वर्षे रा. माजलगाव जि.बीड यांना अटक केली आहे. त्यांनी बीड जिल्ह्यातील माजलगाव ,केज येथील वेगवेगळ्या ठिकाणावरील नदी व तलावामधुन त्याच्या इतर आठ साथिदारांच्या मदतीने वायर चोरी केले असल्याची कबुली दिली.
आरोपी निष्पन्न करुन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना देण्यात आले होते. वायर चोरीच्या सर्व घटनास्थळांना पोलीस उपनिरीक्षक विघ्ने यांच्या पथकाने भेट दिली. आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. चोरी करणाऱ्या आरोपी बाबत माहीती घेत असताना पोउपनि विघ्ने यांच्या पथकाला खबर्यामार्फत गोपनिय माहीती मिळाली की मध्यप्रदेश राज्यातील काही चोरट्ये हे रुद्राक्ष विकण्याच्या बाहाण्याने गावोगाव रेकी करत फिरत आहेत. रात्रीचे वेळी रेकी केलेल्या ठिकाणावरुन मोटार वायर चोरी करत आहेत. सध्या चोरटे हे नांदगाव जिल्हा नाशिक येथे राहण्यास आहेत. माहिती मिळताचा कोणतीही दिरंगाई न करता पो.नि शिवाजी बंटेवाड यांनी पथक नांदगावचे दिशेने रवाना केले. पथकाने नांदगाव येथे जाऊन संशईत इसमांचा शोध घेऊन तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
आरोपीची झाडाझडती घेतली असता त्याच्या ताब्यातुन गुन्हा करते वेळी वापरण्यात आलेल्या दोन मोटारसायकल आणि दीड।लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीना माजलगाव व केज उपविभागातील एकुण ०६ गुन्हे केल्याची स्थानिक गुन्हे शाखेसमोर कबुली दिली आहे. याप्रकरणातील तिन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी केज पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणातील उर्वरित ८ फरार आरोपींचा व चोरी केलेल्या मुद्येमालाचा स्थानिक गुन्हे शाखा आणि केज पोलीस कसोशीने शोध घेत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधिक्षक चेतना तिडके, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, हवालदार महेश जोगदंड, जफर पठाण, दिलीप गित्ते, बप्पासाहेब घोडके, गणेश मराडे यांनी केली आहे.























