Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

शिरुरमध्ये मेफेड्रोन जप्त तिघे अटकेत

शिरुरमध्ये मेफेड्रोन जप्त तिघे अटकेत

मेफेड्रोनसह २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

marathinews24.com

पुणे – मेफेड्रोन (एमडी) विक्री प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तिघांना अटक केली. शिरुर परिसरात ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून ४७.६० मेफेड्रोन, दोन मोटारी, अन्य साहित्य असा २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विशाल मारुती मोरे (वय २०, रा. बाफनामळा, शिरुर, जि. पुणे), प्रतीक संतोष लंघे (वय २५, रा. करडे, ता. शिरुर, जि. पुणे), मिथून विजयपाल सिंग (वय २६, रा. सावताामाळीनगर, शिरुर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

शेतकऱ्यांची मोटर, वायर चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश – सविस्तर बातमी 

‘केंद्र शासनाकडून ‘नशामुक्त भारत अभियान’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत अमली पदार्थ विक्री, तस्कर, पुरवठादारांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक १७ एप्रिलला शिरुर परिसात गस्त घालत होते. त्यावेळी न्हावरे फाटा परिसरातील एका मंगल कार्यालयासमोर दोन मोटारी थांबल्या होत्या. मोटारीतील संशयित मेफेड्रोन विक्रीसाठी आल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून मोरे, लंघे, सिंग यांना पकडले’, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यांच्याकडून मेफेड्रोन, दोन मोटारी, तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले.

मेफेड्रोन खरेदी ऑनलाइन ॲपद्वारे

अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा आरोपींनी मेफेड्रोन ऑनलाइन ॲपच्या माध्यमातून खरेदी केल्याचे तपासात उघडकीस आले. आरोपींपर्यंत अमली पदार्थ पोहचविणाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. पुरवठादाराचा शोध घेण्यात येत असून, आरोपींचे रक्ताचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, असे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी सांगितले.पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक रमेश चाेपडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक निरीक्षक राहुल गावडे आणि पथकाने ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×