Breking News
‘वंदे भारत’ रुळावरून घसरलीआंबेडकरी चळवळ कोणाच्याही आरक्षणाच्या विरोधात नाही; पण अन्यायकारक उपवर्गीकरण खपवून घेतले जाणार नाही!बियाणे उत्पादक कंपनी, वितरक आणि विक्रेत्यांची खरीप हंगामपूर्व राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्नरेस्टॉरंट, हॉटेल्स व फास्ट फूड विक्रेत्यांकडून चीज ॲनालॉग वापरासंदर्भात ग्राहकांना स्पष्ट माहिती देणे बंधनकारकआला उन्हाळा; आपले आरोग्य सांभाळा – विशेष लेखपुण्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत तस्करांना दणकाबुद्ध पौर्णिमेनिमित्त पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीपुण्यात अनधिकृत वास्तव्य, ३ बांग्लादेशी महिला ताब्यातपुण्यात रांका ज्वेलर्सला मॅनेजरनेच घातला १८ कोटींचा गंडापुण्यात मद्यधुंद वाहन चालकांविरूद्ध कारवाईचा बडगा

रेस्टॉरंट, हॉटेल्स व फास्ट फूड विक्रेत्यांकडून चीज ॲनालॉग वापरासंदर्भात ग्राहकांना स्पष्ट माहिती देणे बंधनकारक

रेस्टॉरंट, हॉटेल्स व फास्ट फूड विक्रेत्यांकडून चीज ॲनालॉग वापरासंदर्भात ग्राहकांना स्पष्ट माहिती देणे बंधनकारक

अन्न व औषध प्रशासन यांनी “चीज ॲनालॉग” बाबत ग्राहकांना स्पष्ट माहिती देण्याचे निर्देश

marathinews24.com

पुणे – अन्न व औषध प्रशासन यांनी सर्व रेस्टॉरंट, केटरर्स, हॉटेल्स व फास्ट फूड विक्रेत्यांना अन्नपदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या “चीज ॲनालॉग” बाबत ग्राहकांना स्पष्ट माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.

विशेष लेख आला उन्हाळा; आपले आरोग्य सांभाळा – सविस्तर बातमी 

अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार ग्राहकांना अन्नातील घटकांची अचूक माहिती मिळणे आवश्यक आहे. पनीर हे शुद्ध दुधापासून तयार होते, तर चीज ॲनालॉग हे खाद्यतेल, स्टार्च व इतर घटकांपासून बनविलेले असल्याने त्याचे स्वरूप वेगळे असते.

चीज ॲनालॉग वापरून तयार केलेल्या पदार्थांची माहिती बिलावर नमूद करणे बंधनकारक आहे. मेन्यू कार्ड, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर स्पष्ट उल्लेख आवश्यक आहे. उत्पादक व पुरवठादारांनी विक्री बिलावर “डेअरी/चीज ॲनालॉग” असा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे. ॲनालॉग हा आरोग्यास अपायकार नाही, परंतु त्यातील घटक व पोषणमुल्ये पनीरपेक्षा वेगळी असतात. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी योग्य माहिती असे आवश्यक आहे.

ग्राहकांनी पॅकबंद उत्पादनावरील लेबल तपासावे, सुटे पनीर खरेदीवेळी खात्री करून बिल घ्यावे. हॉटेलमध्ये पनीर व चीज अॅनालॉग स्वतंत्र नमूद आहे का ते पाहावे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादक, पुरवठादार व खाद्य व्यवसायिकांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

पुणे विभागातील रेस्टॉरंट/केटरर्स/हॉटेल्स/फास्ट फुड विक्रेते तसेच चीज ॲनालॉग उत्पादक/पनीरचे उत्पादक/पुरवठादार यांनी कायदयातील तरतुदीचे उल्लंघन केल्याचे आढळ्यास त्यांच्यावर प्रशासनामार्फत अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६, नियम व नियमने अंतर्गत संबंधितांवर कठोर कारवाई घेण्यात येईल. तसेच ग्राहकांनी अशा प्रकारची दिशाभूल झाल्यास त्याबाबत तक्रार प्रशासनाच्या १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर नोंदवावी असे आवाहन दिगंबर भोगावडे, सह आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, पुणे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×