Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

तू माझी नाही झालीस, तर कुणाची होऊ देणार नाही

चारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

कोंढव्यात तरुणीच्या घरात घुसुन मारहाण

marathinews24.com

पुणे – तरूणीने लग्नासाठी नाही म्‍हटल्‍याचा राग मनात धरून तरूणीचा पाठलाग करून तिला व तिच्‍या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तिला तु माझी नाही झालीस, तर कुणाचीज होऊ देणार नाही अशी धमकी दिल्‍याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ३० वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे.

प्रिपेड टास्क’च्या नावाने ३ लाख ६९ हजारांची ऑनलाइन लूट – सविस्तर बातमी

आरोपीने तिचा वारंवार पाठलाग करून तिला मानसिक त्रास दिला आहे. जानेवारी २०२६ ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. आरोपीने पीडितेचा वारंवार पाठलाग केला आणि तिच्या घरात शिरून तिला मारहाण केली. “जर तू माझी झाली नाहीस, तर मी तुला कुणाचीच होऊ देणार नाही आणि तुम्हाला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी त्याने दिली. तसेच आरोपीने पीडितेच्या आईलाही शिवीगाळ केली असून वारंवार फोन करून तिचा छळ केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रसाद जाधव करत आहेत.

पाण्यातून गुंगीचे औषध पाजून केला अत्‍याचार

पुणे- महिलेला पाण्यातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार लोणी काळभोर परिसरात घडला आहे. या गुन्ह्यातील आरोपी अक्षय अशोक सानप (वय २८ वर्षे, रा. सय्यदनगर, हडपसर, पुणे) याच्‍यावर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ३३ वर्षीय पीडित महिलेने पोलिसांत फिर्याद दिली आहे. दि. २५ एप्रिलला पहाटे ४:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

आरोपी अक्षय सानप याने पीडितेची भेट घेऊन तिला काहीही न सांगता जबरदस्तीने दुचाकीवर बसवले. फुरसुंगीच्या दिशेने नेले. वाटेत त्याने पीडितेने पाणी मागितले असता तिला गुंगीचे औषध मिसळलेले पाणी पाजले. यामुळे पीडितेला गुंगी आली असता, आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नाळे करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×